गोंदिया- नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून १९८२ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. या मागणीसाठी गोंदियात आज सर्वच विभागाचे कर्मचारी गोंदिया उप विभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येत धडकले. यावेळी कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
गोंदियात हजारो कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी
अंशदायी पेन्शन योजना लागू करताना सरकारने कर्मचार्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे, राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरिता गोंदिया जिल्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी उप विभागणी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सुधारणा या गोडस नावाखाली सरकारने १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करून १ नोव्हेंबर २०१५ ला अंशदायी पेन्शन योजना लागू केली होती. त्यामुळे, कर्मचार्यांचे भविष्य असुरक्षित झाले आहे. सरकारने समान काम-समान वेतन या नितीला मुठमाती देऊन नवे-जुने कर्मचारी, असा भेदभाव सुरू केला. त्याचबरोबर, अंशदायी पेन्शन योजना लागू करताना शासनाने कर्मचार्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे, राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरता गोंदिया जिल्ह्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी उप विभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यात पोलीस विभागातील कर्मचारी देखील उपस्थित होते. १ नोव्हेंबर २०१५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कार्यलयासमोर आपला मागण्या घेऊन एकत्र येत धरणे आंदोलन केले. मात्र, याचा फटका शासकीय कार्यलयात ग्रामीण भागातून कामाकरता येणाऱ्या लोकांना बसला आहे.
हेही वाचा-रानडुकराची शिकार करणार्या दोघांना अटक