गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव ते देवरी या मार्गाचे दुरुस्ती काम सुरू आहे. या कामासाठी द्वारे लागणारा कच्च्या मालाची वाहतूक केली जाते. मात्र, या कामासाठी अवैध रित्या वाळूची वाहतूक केल्या प्रकरणी २ मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जप्त करत मालकांना ३ लाख ८७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या २ टिप्परवर कारवाई; वाहन मालकांना ठोठावला लाखोंचा दंड
मानेगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत गैरअर्जदार डी. पी. जगताप(रा. बारामती पुणे) यांचा टिप्पर ५ ब्रास खडीसह (एमएच. ४२/टी. १२५५) मध्ये अडवण्यात आला. यावेळी टिप्पर चालक लक्ष्मण ठाकरे (रा. गिधाडी) यांच्याकडून कागदपत्राची तपासणी केली असता, टिप्पर वाहतूक अवैध असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी आमगाव तहसील न्यायालयात प्रकरण सुनावणीस आले. त्यावेळी सुनावनीअंती महसूल विभागाने वाहन मालाकस एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
आमगाव ते देवरी या मार्गाचे सध्या काम सुरु आहे. या रस्त्यासाठी लागणाऱ्या वाळू आणि खडीची वाहतूक द्वारे वाहतूक केली जाते. मात्र, यातील दोन च्या माध्यमातून आमगाव अवैधपणे विनापरवाना वाळू खडीची वाहतूक केली जात होती. या वाहनावर आमगाव तहसील कार्यालकडून कारवाई करण्यात आली आहे. मानेगाव येथे करण्यात आलेल्या कारवाईत गैरअर्जदार डी. पी. जगताप(रा. बारामती पुणे) यांचा ५ ब्रास खडीसह (एमएच. ४२/टी. १२५५) मध्ये अडवण्यात आला. यावेळी चालक लक्ष्मण ठाकरे (रा. गिधाडी) यांच्याकडून कागदपत्राची तपासणी केली असता, वाहतूक अवैध असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी आमगाव तहसील न्यायालयात प्रकरण सुनावणीस आले. त्यावेळी सुनावनीअंती महसूल विभागाने वाहन मालाकस एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
तर दुसर्या घटनेत मानेगाव येथे महेंद्र जैन (रा. आमगाव )यांच्या टिपरमध्ये ( क्र. एमएच. ३५/ए.जे. 0३१८) १ ब्रास अतिरिक्त वाळू अवैधपद्धतीने वाहतूक करताना उपविभागीय अधिकारी देवरी यांनी पकडली. यावरही कारवाई करून अंतिम सुनावनीअंती तहसीलदारांनी १ लाख १५ हजार ४00 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन्ही घटनेत १२ जानेवारी २0१८ च्या तरतुदीनुसार दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ३ लाख ८७ हजार ४०० रुपयाचा दंड दोन्ही मालकावर ठोठावण्यात आला आहे. तसेच ही रक्कम त्वरीत जमा करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत.