महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैयक्तिक हित साधण्यासाठी शाळेची बदनामी, इंदिरा सपाटे यांचे आरोप

७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुल्क न भरल्यामुळे त्यांना एसएमएस फोन व पत्र पाठविण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला पेपर घेतला नाही व नेमका आमच्या हेतू साध्य झाला आणि पालक शाळेत आले, या विद्यार्थ्यांचा पेपर शेवटची घेण्यात आला होता.

वैयक्तिक हित साधण्यासाठी शाळेची बदनामी

By

Published : May 4, 2019, 11:56 AM IST

गोंदिया - एनएसयूआय या गोंदिया पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक शुल्क न दिल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येत आहे असे सांगत शाळेची बदनामी केली जात आहे, मात्र या संघटनेच्या माध्यमातून वैयक्तिक हित साधण्यासाठी शाळेला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप पब्लिक शाळेचे सचिव डॉक्टर इंदिरा सपाटे यांनी केला.

वैयक्तिक हित साधण्यासाठी शाळेची बदनामी

एनएसयुआय गोंदिया यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गोंदिया जिल्ह्यात शाळांविरोधात आक्रमक झाली आहे. वाढीव शुल्क रद्द न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआयने दिला होता, तसेच गोंदिया पब्लिक शाळेमधील शैक्षणिक शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याच्या प्रकाराबाबत ही माहिती दिली होती. सपाटे सांगितले की, एनएसयुआय शाळेची बदनामी करीत आहे मात्र वास्तविक सात विद्यार्थी होते. या ७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शुल्क न भरल्यामुळे त्यांना एसएमएस फोन व पत्र पाठविण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे विद्यार्थ्यांचा पहिला पेपर घेतला नाही व नेमका आमच्या हेतू साध्य झाला आणि पालक शाळेत आले, या विद्यार्थ्यांचा पेपर शेवटची घेण्यात आला होता.

एनएसयुआय यांच्या माध्यमातून शाळेवर आरोप करणारे आलोक मोहंती यांच्या परिवारातील मुलगी आमच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थ्यांची मागील ३ वर्षापासून शैक्षणिक शुल्क भरण्यात आलेली नाही शिवाय त्यांच्याकडून देण्यात आलेल्या चेक बाऊन्स झाला आहे. गोंदिया पब्लिक स्कूल खासगी तत्त्वावर असून शासनाकडून अनुदान मिळत नाही अशात पालकांकडून फीस न आल्यास शाळा चालविणे कठीण जाते त्यामुळे पालकांना शैक्षणिक शुल्कासाठी बोलावुन घ्यावे लागले. शिवाय विलंब शुल्कसाठी कुठलीही तरतूद शाळेत नसल्याचेही त्यांनी सांगितले, मात्र आपल्या चुकांवर पडदा टाकून शाळेला बदनाम करण्याचा हा घाट रचला जात आहे, आमच्या शाळेकडून विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना जमेल ते सहकार्य केले जात आहे. अशा शाळेवर लावण्यात आलेला आरोप बिनबुडाचे असल्याचे डॉ. सपाटे यांनी पत्रपरिषदेत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details