महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

पॅरोलवर सुटलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याला महिलेच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

By

Published : Dec 28, 2020, 6:05 PM IST

Suicide of a prisoner Gondia
पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

गोंदिया -पॅरोलवर सुटलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. भडंगा मार्गावर या कैद्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बेनीराम आडकू टेंभुर्णीकर (७८ वर्ष) असे या कैद्याचे नाव आहे. याप्रकणी गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

खून प्रकरणात झाली होती जन्मठेपेची शिक्षा

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत कैदी बेनीराम याने चार वर्षांपूर्वी एका महिलेचा खून केला होता. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याची रवनागी नागपूर कारागृहात करण्यात आली होती. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, न्यायालयाच्या निर्देशानुसार काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. त्यामध्ये बेनीराम टेंभुर्णीकर याचाही समावेश होता. त्याला 45 दिवसांचा पॅरोल मंजुर करण्यात आला होता. पॅरोलवर असताना त्याने 27 डिसेंबर रोजी भडंगा परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

आरोपीजवळ सापडली सुसाईड नोट

आत्महत्या करण्यापूर्वी बेनीराम याने एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. आपण आत्महत्या करत आहोत. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका, असे त्याने या सुसाई़ड नोटमध्ये म्हटले होते. तसेच त्याने या सुसाईड नोटमध्ये आपल्या नातेवाईकांचा नंबर देखील लिहीला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details