महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वे पोलिसाने वाचवला महिलेचा जीव; गोंदियातील घटना

बलवान सिंह या रेल्वे पोलिसाने धावत्या रेल्वेमध्ये बसताना रुळावर पडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला. सरोज खेमराज घोडेस्वार (वय ३३) असे या महिलेचे नाव आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी ८.१० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली.

रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी बलवान सिंह

By

Published : Aug 27, 2019, 5:54 PM IST

गोंदिया - रेल्वे पोलिसाने धावत्या रेल्वेमध्ये बसताना रुळावर पडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी ८.१० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली. ही महिला छोटा गोंदिया येथील रहिवासी आहे.

रेल्वे पोलिसाने वाचवला महिलेचा जीव; गोंदियातील घटना
सरोज खेमराज घोडेस्वार (वय ३३) या सकाळी आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूरला जात होत्या. गाडी सुटत असल्याने गाडी पकडण्याकरता धावत्या रेल्वेच्या जनरल डब्यात चढण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. दरम्यान, महिलेला तोल सांभाळता आला नाही. महिला रेल्वेच्या खाली पडून रुळावर जात होती. ही बाब जवळच असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी बलवान सिंह यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने त्या महिलेकडे धाव घेतली. महिलेला बाहेर खेचत तिचे प्राण वाचवले. या घटनेत महिला जखमी असून तिच्यावर उपचार करण्यात आले. रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला. रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठांनी बलवान सिंह यांच्या सतर्कतेचे कौतुक करत त्यांना १००० रुपयांचे बक्षिस जाहीर केले.

ABOUT THE AUTHOR

...view details