गोंदिया - भंडारा-गोंदिया मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही तब्बल पाऊणेसहा लाख मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या २०१४ च्या निवणुकीच्या तुलनेत ३.९४ टक्के मतदान कमी झाल्याचे समोर आले आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात व्यापक जनजागृती करूनही मतदानाचा टक्का घसरला
मतदान केंद्रावर सखी आदर्श मतदार केंद्र स्थापना केले होते. एवढेच नाहीतर घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहोचवण्यात आली. त्यानंतर अनेक मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला नाही. सोशल मीडियावरूनही व्यापक जनजागृती करण्यात आली. मात्र, त्याचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.
गेल्या ११ एप्रिलला गोंदिया मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात १८ लाख ८ हजार ७३४ मतदार आहेत. त्यामधील ९ लाख ५ हजार २७२ पुरूष मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ७४९ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला, तर तब्बल २ लाख ७८ हजार ५२३ मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत. ९ लाख ३ हजार ४६० महिला मतदारांपैकी ६ लाख ८ हजार १४७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, तर तब्बल २ लाख ९५ हजार ३१३ महिला मतदारांनी मतदान केलेच नाही.
विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान बघितल्यास शहरी मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. भंडारा शहरातील १ लाख २५ हजार ९१४, तर गोंदिया शहरातील १ लाख १३ हजार ७५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.
ग्रामीण भागातील तुमसर विधानसभा क्षेत्रात ८९ हजार ३४, साकोली विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ७०५, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ७२ हजार २६८, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८३ हजार ८४२ मतदारांनी मतदान केले नाही.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबवली होती. गोंदिया येथे 'स्वीप ट्रेन'ची पेंटिंग करून सेल्फी पॉईंट बनवण्यात आले. रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले. महारांगोळीचेही आयोजन केले होते. तसेच मतदान केंद्रावर सखी आदर्श मतदार केंद्र स्थापना केले होते. एवढेच नाहीतर घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहोचवण्यात आली. त्यानंतर अनेक मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला नाही. सोशल मीडियावरूनही व्यापक जनजागृती करण्यात आली. मात्र, त्याचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.