महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय योग दिन : गोंदिया पोलिसांनी तणावमुक्त होण्यासाठी केला योग

पोलीस दलातील जवानांना नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावताना ताण-तणाव येतो. मात्र योगा केल्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ राहील अशी आशा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी व्यक्त केली.

पोलीस अधीक्षक विनिता साहू

By

Published : Jun 21, 2019, 2:24 PM IST

गोंदिया- पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पर्वावर गोंदिया पोलीस विभागाने योगा केला. पोलिसांनी तणावमुक्त राहून नक्षल भागात आपले कर्तव्य यशस्वीरित्या बजावत राहावे, यासाठी पोलीस मुख्यालय हजारो पोलीस जवानांनी योगा केला. आपले शरीर सुदृढ रहण्यासाठी दररोज योग करण्याचा पोलिसांनी प्रणही घेतला.

पोलीस अधीक्षक विनिता साहू


गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त भाग असून या भागात काम करताना पोलीस कर्मचारी व अधिकारी ताण तणावाचे जीवन जगतात. मात्र योगा केल्याने त्यांना तणावमुक्त जीवन जगता यावे, आपले कर्तव्य ते योग्यरित्या पार पाडावे, यासाठी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी योग पोलीस मुख्यालयात योगाचे आयोजन केले होते. येथे पोलीस व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी योगा केला.


आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पोलीस विभागाकडून वृक्षारोपणही करण्यात आले. वृक्ष आहेत तर जीवन आहे, असा संदेश देत गोंदिया येथील पोलीस मुख्यालय कारंजा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details