महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पळसाच्या फुलाचे होळी महत्व, वसंत ऋतू लागताच गोंदियात फुलला पिवळा पळस

होळीच्या सणात या फुलापासून तयार होणाऱ्या रंगला आणि गुलालाला होळी निमित्त मोठी मागणी असते. अशाच पळसाच्या दोन रंगाची फुले खास ई टीव्ही भारतच्या प्रेक्षकानासाठी घेऊन आलो आहोत गोंदिया जिल्ह्यातून.

By

Published : Mar 20, 2019, 8:51 PM IST

वसंत ऋतू लागताच गोंदियात फुलला पिवळा पळस

गोंदीया - वंसत ऋतू लागताच गोंदियात पिवळ्या पळसाला फुल यायला सुरवात झाली आहे. आजपर्यत आपण अनेक रंगांची फुलं पहिली आहेत. मात्र, पिवळ्या रंगाचे पळसाचे फुल क्वचितच पाहायला मिळते. जाणून घेऊया कुठे आहे, हा पिवळा पळस आणि कशासाठी या पळसाच्या फुलांचा उपयोग केला जातो.

पळसाच्या फुलाचे होळी महत्व, वसंत ऋतू लागताच गोंदियात फुलला पिवळा पळस

पळसाला पाने तीन ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. मात्र, याच पळसाला तीन रंगाची फुलेदेखील येतात. अशाच पळसाच्या दोन रंगाची फुले खास ई टीव्ही भारतच्या प्रेक्षकानासाठी घेऊन आलो आहोत गोंदिया जिल्ह्यातून. ड्रोन कॅमेऱ्याच्या मध्यमतून नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात विविध प्रजातींचे दुर्मिळ वृक्ष असून या वृक्षांवर लाखो पशू पक्ष्याचा अधीवास असतो. मात्र, याच वृक्षाच्या माध्यमातून त्यांना खाद्य सामग्रीदेखीली मिळत असते. अशाच दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन व्हावे आणि याची माहिती भावी पिढीला व्हावी, या दृष्टिने गोंदियाचे तत्कालीन जिलाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुर्मिळ प्रजातीच्या वृक्ष संगोपनाचा संदेश देण्यासाठी दुर्मिळ वृक्षाचा शोध घेत गोंदिया जिल्ह्यात अत्यंत दुर्मिळ पिवळा आणि पांढरा पळस आहे, हे शोधून काढले. आज पिवळ्या पळसाची फुले आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. होळीच्या सणात या फुलापासून तयार होणाऱ्या रंगला आणि गुलालाला होळी निमित्त मोठी मागणी असते.

आज या पिवळ्या आणि केशरी पळसाच्या फुलांचा आनंद घेण्यासाठी मनुष्यच नाही. तर पशू-पक्षीदेखील या झाडांवर आपल्या चोचीने फुलातील अर्क ओढून आपले पोट भरताना दिसत आहे. याच वाढलेल्या फुलांपासून बचत गटातील महिला. होळी निमित्त सेंद्रिय रंग तयार करत आहेत. या रंगांना बाजारातदेखील मोठी मागणी आहे. तर भविष्यात याच फुलांपासून तयार झालेल्या सेंद्रिय रंगांचा वापर खादी कपड्यांवरही होताना दिसणार आहे. या फुलांची माहिती होताच बाहेरील पर्यटक गोंदियात फुललेल्या पिवळ्या पळसाला पाहायला येत आहेत. आपणदेखील या दुर्मिळ वृक्षाचे महत्व इतरांना पटवून सांगत त्याची लागवड करू.

या दुर्मिळ फुलांचा वापर होळी सनापुरता न करता हंगामी स्वरूपात आपल्या घरात रांगोळीत टाकण्या करता किंवा सजावटी करतादेखाली करू शकता येतो. त्यामुळे आपण सर्वानी होळीनिमित्त संकल्प करून या दुर्मिळ पिवळ्या पळसाचे संगोपण करू.

ABOUT THE AUTHOR

...view details