गोंदिया - जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील खोडसिवनी रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरुन जवळ असलेल्या सौंदड रेल्वे स्टेशनच्या दिशेने अगदी 200 मीटर अंतरावर रेल्वेची हायपर टेन्शन लाईनवर पावसामुळे अचानक सार्कसर्किट झाल्याची दुर्घटना घडली. ही घटना आज (मंगळवारी) सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत मार्निंग वॉकला गेलेल्या मुलांपैकी तिन मुलांना रेल्वे ट्रॅकवर या शॉटसर्किटचा धक्का लागला. त्यात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. करन विनायक राऊत (16) असे मृत मुलाचे नाव आहे. तर जखमींमध्ये निलज देवानंद राऊत (18) आणि नयन विनायक राऊत (18) या दोघांचा समावेश आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
रेल्वेट्रॅकवर शॉटसर्किटने एकाचा मृत्यू; तर दोघे जखमी
सकाळी एक मालवाहक गाडी साडेसहा वाजता सदर रुळावरुन गेल्यानंतर 7 वाजेच्या सुमारास हे मुले मॉर्निग वॉककरीता रेल्वे ट्रॅकवर गेले होते. या दरम्यान अचानक शॉटसर्किट झाले आणि यावेळी रेल्वे रुळावर रेल्वेचे हायटेंशन वायर पडले होते. या मुलांना या वायरचा धक्का लागला. प्रत्यक्षर्शींनी सांगितले की, सदर घटनेच्या वेळी मोठा स्फोट झाला आणि पाच मिनिटांपर्यंत मोठ्याने आवाज होत होता.

घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी रेल्वे विभाग आणि पोलीस ठाणे डुग्गीपार यांना सूचना दिली. यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. सध्या तार रेल्वे विभागाकडून दुरुस्त करण्यात येत आहेत. तर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सुरू आहे.