महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया: खासगी रुग्णालयाच्या आवारात तलवारीने निर्घृण खून

संयोग रुग्णालयाच्या आवारातील गेट जवळच ४० वर्षीय व्यक्तीचा आरोपींनी तलवारीने खून केला आहे. त्या व्यक्तीच्या अंगावरून चारचाकी चालविण्यात आली आहे.

निर्घृण खून
निर्घृण खून

By

Published : Jan 15, 2021, 3:31 AM IST

गोंदिया- शहरात निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे. ही खूनाची घटना रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संयोग रुग्णालयाच्या आवारात गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली आहे. रवि बोबाडे ( ४० वर्ष रा. धापेवडा) असे मृताचे नाव आहे.

संयोग रुग्णालयाच्या आवारातील गेट जवळच ४० वर्षीय व्यक्तीचा आरोपींनी तलवारीने खून केला आहे. त्या व्यक्तीच्या अंगावरून चारचाकी चालविण्यात आली आहे. खून करून आरोपी घटना स्थळावरून फरार झाले. घटनाची माहिती पोलिसांना मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details