महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रस्त्यावर पोलीस पकडतील, मजुरांची रेल्वे रुळावरून पायपीट..

मध्यप्रदेशच्या मंडला गावातील १३ मजुरांनी मायभूमीत परतण्यासाठी रेल्वे रुळांवरून पायपीट करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या धास्तीने त्यांनी रस्त्याऐवजी रेल्वे रूळावरून चालत प्रवास सुरू केलाय.

gondiya lockdown news
रस्त्यावर पोलीस पकडतील, म्हणून मजूरांची रेल्वे रूळांवरून पायपीट..

By

Published : Mar 28, 2020, 6:51 PM IST

गोंंदिया - मध्यप्रदेशच्या मंडला गावातील १३ मजुरांनी मायभूमीत परतण्यासाठी रेल्वे रुळांवरून पायपीट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या देशभर लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. यातील काहींनी थेट चालत परतण्याची निर्णय घेतला. यातच मध्यप्रदेशच्या १३ मजूरांचा समावेश आहे. रस्त्याने गेल्यास पोलीस आडवतील, या भीतीने त्यांनी थेट रेल्वे रुळांवरून १७० किमी पायपीट करण्यास सुरुवात केलीय.

रस्त्यावर पोलीस पकडतील, म्हणून मजूरांची रेल्वे रूळांवरून पायपीट..


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चच्या रात्री बारापासून लॉकडाऊन घोषित केले. तसेच नागरिकांना ज्या ठिकाणी आहात, तिथेच थांबण्याचा सल्ला दिला. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी विविध मर्गांनी स्व:तचे गाव जवळ करण्यास सुरुवात केली. यासाठी कुणी दुधाच्या गाडीत, तर कुणी फळांच्या तर कुणी ट्रकमधून लपून गावाला जाण्यास निघाले. तसेच अनेक लोक चालत आपापल्या घरी गावी निघाले. यातच मध्य प्रदेशचे मजूर पोलिसांच्या धास्तीने थेट रेल्वे रूळावरून चालत निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details