गोंदिया - गोरेगाव तालुक्याच्या मुंडीपार गावात अवैध ब्रँडेड कंपनीच्या देशी-विदेशी दारूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. सपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधपणे दारू तयार करण्यात येत होती.