गोंदिया -महिला दिनाचे अवचित्त साधून हेल्मेट सक्तीचा संदेश देण्यासाठी गोंदियात महिलांनी काढली बाईक रॅली. पोलीस अधीक्षक वनिता साहू जिल्हाधिकरी कादंबरी बलकवडे यांनी देखाली घातला बाईक रॅलीत हेल्मेट.
गोंदियात बाईक रॅलीच्या माध्यमातून महिलांनी दिला हेल्मेट सक्तीचा संदेश
गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला २० वर्षाचा कालावधी लोटला आहेत. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आले आहे. गोंदिया जिल्यात जिल्हाधिकरी आणि पोलिस अधीक्षक म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुरूषप्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के अधिकार मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरी मध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचे अनेक उदाहरण बघावयास मिळतात. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला २० वर्षाचा कालावधी लोटला आहेत. जिल्ह्याची सुरक्षा व विकास आता महिलांच्या हाती देण्यात आले आहे. गोंदिया जिल्यात जिल्हाधिकरी आणि पोलिस अधीक्षक म्हणून महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कादंबरी बलकवडे या जिल्हाधिकरी म्हणून काम पाहत आहेत तर वनिता शाहू हे पोलिश अधीक्षक म्हणून कामकाज पाहत आहेत.
आज महिला दिना निमित्त महिला विकास आर्थिक महामंडळातर्फे गोंदिया शहरात महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये स्वतः जल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व जिल्हा लिस अधीक्षक विनिता साहू सहभागी झाल्या. गोंदिया शहरातील नेहरू चौका मधून ही रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावरून शहरात ही मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये प्रत्येक मोटारसायक वर प्रत्येक महिलांनी हेल्मेट घालून या मोटरसायकल रॅली मध्ये सहभाग घेतला. शहरवासीयांना मोटरसायकल चालवताना हेल्मेट वापरा हा संदेश दिला. येत्या निवणुकीत प्रत्येक वैक्तीने आपला मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. असा संदेश ही या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातुन देण्यात आला.