महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांकडून ८३ लाख २२ हजाराचा दंड वसूल

दुचाकी, चारचाकी वाहने बेदरकारपणे चालवणे, सिग्नल तोडणे, धावत्या दुचाकीवर मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही. तसेच, शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन मुले त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये कोंबवून बसवणे सुरूच आहे. वाहतूक पोलिसांकडून यावर कारवाई सुरू आहे. मात्र, तरी देखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.

By

Published : Jan 25, 2020, 9:09 AM IST

gondia
कारवाई करताना वाहतूक पोलीस

गोंदिया- रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक शिबिरे होत आहे. मात्र, असे असतानाही वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहे. सुरक्षा सप्ताह सुरू असताना वाहतुकीला शिस्त लागेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतरही बेशिस्तपणे वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे.

माहिती देताना वाहतूक पोलीस निरीक्षक दिनेश तायवाडे

दुचाकी, चारचाकी वाहने बेदरकारपणे चालवणे, सिग्नल तोडणे, धावत्या दुचाकीवर मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही. तसेच, शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन मुले त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांमध्ये कोंबवून बसवणे सुरूच आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात विद्यार्थी बेफिकिरीने दुचाकी चालवत आहेत. वाहतूक पोलिसांकडून यावर कारवाई सुरू आहे. मात्र, तरी देखील वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक विभागाने जानेवारी ते डिसेंबर २०१९ पर्यंत तब्बल ३२ हजार १४ वाहनांवर कारवाई केली असून ८३ लाख २२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. मात्र, या कारवाईचा काही खास प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही.

आज गाड्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांमुळे लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर, अपघातांची संख्या देखील वाढली आहे. पार्किंगसाठी सोय करणार असल्याचे बऱ्याच दिवसांपासून आश्वासने मिळत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ही आश्वासने पूर्ण होताना दिसत नाही. शहरात गाड्या कुठेही कशाही ठेवल्या जातात. यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. व्यवस्थित वाहतूक होण्यासाठी वाहनचालकांना शिस्तीत असणे गरजेचे आहे. फक्त कायदे असून चालत नाही तर, त्या कायद्यांचे पालन होणेही गरजेचे आहे. आणि तसे झाले नाही तर सक्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे, प्रशासनाने वाहचालकांना शिस्तीत आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

परवाना नसताना वाहनचालकाने गाडी चालवली तर दंडाबरोबरच त्याला ३ महिने कारावासाची शिक्षा कायद्यात सांगितली आहे. मात्र, प्रत्यक्षात या कायद्याची कुणाला माहितीच नसल्याचे चित्र आहे. या कायद्याची नागरिकांमध्ये भीती असती तर विना परवाना वाहन चालकांवर वचक बसला असता. मात्र, याबाबत चित्र उलटे आहे. एरवी कडक तपासणी झाली तर फक्त ३५ टक्के लोकांजवळ परवाने नसल्याचे आढळून येईल. म्हणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने लोकसहभागातून वाहतुकीला शिस्त लावने गरजेचे आहे. लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जागृत करणे, आपल्या जिवाचे महत्व पटवून देणे यातूनच ते शक्य होऊ शकते.

हेही वाचा-'शरद पवार यांची सुरक्षा राजकीय द्वेषापोटी काढण्यात आली'

ABOUT THE AUTHOR

...view details