गोंदिया- दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वडेगावात घडली. शेतकरी शेळ्यांसाठी चारा आणायला त्याच्या शेतावर गेला होता. त्या दरम्यान, अस्वलांनी त्याच्यावर हल्ला केला. सीताराम सकाराम बिसेन (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गोंदियात दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी ठार
शेतकरी बिसेन हे आपल्या शेतावर शेळ्यांसाठी चारा आणायला गेले होते. दरम्यान, बिसेन यांच्यावर अचानक दोन अस्वलांनी हल्ला चढवला व त्याना शेजारी असलेल्या नाल्याजवळ फरफटत नेऊन ठार केले. या घटनेची माहिती गावातील गुराख्याने गावात दिली.
शेतकरी बिसेन हे आपल्या शेतावर शेळ्यांसाठी चारा आणायला गेले होते. दरम्यान, बिसेन यांच्यावर अचानक दोन अस्वलांनी हल्ला चढवला व त्याना शेजारी आसलेल्या नाल्याजवळ फरफटत नेऊन ठार केले. या घटनेची माहिती गावातील गुराख्याने गावात दिली. दरम्यान, बातमीच्या वृताने गावकऱ्यांनी नाल्यावर एकच गर्दी केली होती. मृत शेतकरी बिसेन यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. घरातील कुटुंबप्रमुख व कर्ता पुरुष निघून गेल्याने वडेगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची दखल तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डमाले, हवालदार बांते आणि वनभिगाचे पांचाळे यांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा-नक्षलग्रस्त भागातील मुलींना सामाजिक संस्थेकडून सायकल वाटप