गोंदिया - देवरी येथील पंचायत ( Deori Grampanchayat ) समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक ( Chandramani Modak Arrest ) यांनी ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या रस्ते बांधकाम व (मनेरगा) कामासाठी साहित्य पुरविण्यासाठी झालेल्या टेंडरचे बील मंजूर करून बील काढण्यासाठी ६५ हजाराची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
काय आहे प्रकरण -
देवरी तालुक्यात ग्रामपंचायतींना विविध शासकीय योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामाकरीता ग्रामपंचायतीकडून टेंडर झाल्यानंतर विविध साहित्य पुरविण्याचे कामे संस्थेमार्फत करण्यात येते. पंचायत समिती देवरी मार्फत बील मंजूर झाल्यानंतर संस्थेला मिळत असतात. संस्थेतर्फे ग्रामपंचायती कडून टेंडर झाल्यानंतर विविध साहित्य पुरविण्याचे व त्या (मनरेगा) अंतर्गत सन २०१७ या आर्थिक वर्षामध्ये मौजा भागी व मौजा पिंडकेपार ग्रामपंचायती अंतरंगात रस्ते बांधकाम व खडीकरणाचे काम मंजूर झाले होते. या कामांना ग्रामपंचायतीकडून टेंडर मिळाल्यानंतर तक्रारदार यांच्या संस्थेने दोन्ही ग्रामपंचायतींना या कामाकरीता अंदाजे ३८ लक्ष रूपयांचे साहित्य पुरवठा केले होते. त्याचप्रमाणे मनरेगा अंतर्गत दोन्ही ग्रामपंचायतीचे बिले मंजुरी करीता पाठविण्यासाठी तक्रारदाराकडून या आधी ३० हजार रूपये घेतले व उर्वरित ६० हजार रूपये व पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सही करून इस्टीमेट दिल्याचा मोबदल्यात या आधी १० हजार रूपये घेतले होते. तसेच उर्वरित १० हजार रूपये अशी एकूण ७० हजार रूपये लाच रक्कमेची मागणी केली होती.