गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ असे पांढऱ्या रंगाचे (अल्बिनो) सांबर आढळून आल्याने वन्यजीव विभागासह वन्यप्रेमींमध्ये कुतूहलाचा विषय झाला आहे. जिल्ह्यातील वन वैभवात विविध पक्ष्यांसह प्राण्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्यातच फुलपाखरांच्या तर अनेक प्रजाती जिल्ह्यातील नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पाच्या भागात पाहायला मिळतात.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात आढळले दुर्मिळ 'अल्बिनो' सांबर
नवेगावबांध नागझिरा व्याघ्र उद्यानात दुर्मिळ असे पांढऱ्या रगांचे सांबर आढळून आले आहे. यापुर्वी 2017 मध्ये गुजरातमधील गीरमध्ये असेच सांबर आढळल्याची नोंद आहे. या पांढऱ्या सांबराचा कानाचा रंग हलका गुलाबी, पिंगट डोळे आणि तृण आच्छादित भूपृष्ठावर उठून दिसणारा आहे.
हेही वाचा -गोंदियामध्ये आठ एकर धानाचे पुंजणे जाळले; पाच लाखांचे नुकसान
नवेगावबांध नागझिरा व्याघ्र उद्यानात दुर्मिळ असे पांढऱ्या रगांचे सांबर आढळून आले आहे. यापुर्वी 2017 मध्ये गुजरातमधील गीरमध्ये असेच सांबर आढळल्याची नोंद आहे. या पांढऱ्या सांभराचा कानाचा रंग हलका गुलाबी, पिंगट डोळे आणि तृण आच्छादित भूपृष्ठावर उठून दिसणारा आहे. शरीरात मेलेनीनचे प्रमाण कमी असल्यामुळे किंवा नसल्यामुळे डीएनएत बदल होऊन रंग पाढंरा येतो. अशा शारीरीक बदल झालेल्या प्राण्यांना अल्बिनो म्हणतात. या प्राण्यांच्या शरीरातील रंगद्रव्य कमी असते. त्यामुळे कातडीचा रंग पांढरा, केस भुरकट असतात, अशा प्राण्यात दृष्टीदोष असतो. समाज माध्यमांवर या अल्बिनो सांबराचे फोटो व्हायरल झाल्यामुळे या दुर्मिळ सांबराला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.