गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे शनिवारी आलेल्या गोंदिया येथील प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे. शनिवारी ३३ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाला घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सद्य स्थितीत क्रियाशील रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तब्बल ३३ इतकी आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील २४ रुग्ण असून आठ रुग्ण कुडवा, दोन रुग्ण गोंदियाच्या श्रीनगर भागातील, सहा रुग्ण गोंदियाच्या सिंधी कॉलोनी येथील आहे. एक रुग्ण वेस्ट इंडिज येथून दोन रुग्ण मुंबई येथून, तीन रुग्ण पुणे येथून, एक रुग्ण वर्धा येथून, एक रुग्ण दुर्ग येथून आलेला आहे. एक रुग्ण लांजी येथून जिल्ह्यात आलेला आहे.
सडक/अर्जुनी तालुक्यात दोन रुग्ण आढळून आले. यापैकी एक रुग्ण नांदेड येथून आलेला आहे. देवरी येथे पाच रुग्ण आढळले आहे. एक रुग्ण हा गोरेगाव येथील असून तो औरंगाबाद येथून आलेला आहे. या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता ३२६ झाली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ९ हजार ४५७ नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी ८ हजार ९५३ नमुने निगेटिव्ह तर ३०९ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे. ७२ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. १२३ नमुन्यांबाबत अनिश्चितता आहे. जिल्ह्याच्या बाहेर चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. गोंदिया येथील प्रयोगशाळेतून ३०९ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून तेरा असे एकूण ३२६ बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले आहे. विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १८७ आणि गृह विलगिकरणात ९७८ असे ११६५ व्यक्ती विलगिकरणात आहे. ह्या सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभाग त्यांना भेट देऊन उपचार करीत आहे. बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.
शनिवारीपर्यंत जिल्ह्यातील २३०७ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २ हजार २९४ अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १७३ चमू आणि ६७ सुपरवायझर ४१ कॅटेंटमेंट झोनसाठी नियुक्त केले आहे. जिल्ह्यात ४१ क्रियाशील कॅटेंटमेंट झोन आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात मुंडीपार, फत्तेपुर, डोंगरगाव, सेजगाव, चांदणीटोला, पारडीबांध, गोंदिया येथील कुंभारेनगर , सिव्हिल लाईन. रेल्वे लाईन, कुडवा.सालेकसा तालुक्यातील, पाथरी, पाउलदौना, शारदानगर, रामाटोला व तितेपार, देवरी तालुकयातील देवरी येथील वार्ड क्रमांक ५, ८, ९, १० आणि १६, आखरीटोला, गरवारटोली, सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा, वडेगाव व पाटेकुरा गोरेगाव तालुक्यातील भडंगा, डवा व घोटी आणि तिरोडा तालुक्यातील तिरोडा येथील सुभाष वार्ड, विर वामनराव चौक, भूतनाथ वार्ड, न्यू सुभाष वार्ड, किल्ला वार्ड, नेहरू वार्ड, गराडा, बेरडीपार, बेलाटी/खुर्द, मुंडीकोटा अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आदी गावे आणि वार्डचा या कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.