गडचिरोली - रानभाज्या तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दिभना येथील महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 5च्या सुमारास घडली आहे. वंदना अरविंद जेंगठे (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे.
रानभाजी तोडण्यासाठी जंगलात गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
रानभाजी तोडण्यासाठी जंगलात गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वंदना या काही महिलांसोबत रानभाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुड्याची फुले तोडण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. या घटनेमुळे दिभना परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. आठवड्यातील ही तिसरी घटना असून तालुक्यात वाघाच्या हल्य्यात अनेक महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली असताना वन विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने अनेकांना वाघाची शिकार होऊन आपले प्राण गमवावे लागत आहेत.