गडचिरोली -अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेंचे काही शिक्षक अनुपस्थित असल्याने शाळांना कुलूप असल्याचे चित्र आहे. एका शाळेत तर शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यालाच मानधनावर नियुक्त केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन शिक्षिकांना निलंबीत केले आहे. तर एका शिक्षिकेचे दोन वेळेची पगारवाढ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षिकांचे निलंबन; स्वतः शाळेत न जाता शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांची केली नियुक्ती हेही वाचा -अमेरिकेतील सम्मेलनाला डॉ. बंग दाम्पत्य करणार संबोधित
कोरची तालुक्यातील बोटेझरी आणि नारकसा या दोन गावातील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. बोटेझरी येथे कार्यरत असलेल्या दोन्ही शिक्षिका शाळेत न जाता त्यांनी विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी एका दहावीच्या विद्यार्थ्याला २५०० रुपये मासिक रक्कम देत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर नारकसा येथील शिक्षिका शाळेत शिकवायलाच येत नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांनी चौकशी करून बोटेझरी येथील स्मिता मस्के आणि वनमाला खोब्रागडे या दोन शिक्षीकांना निलंबित केले असून नारकसा येथील धनश्री मिसार यांचे दोन वेळचे पगारवाढ थांबवण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा -डॉ. प्रकाश आमटेंना 'लाईफटाईम अचिव्हमेंट मेडल' जाहीर; बिल गेट्स करणार सत्कार
आठ दिवसांपूर्वी अशाच प्रकारे जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असलेला धनपाल मिसार या प्राथमिक शिक्षकाने शाळेत सतत गैरहजर असतानाही पगार उचलण्याच्या कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधीत शिक्षकाला निलंबित केले होते. या प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळांमधील कारभार चव्हाट्यावर आला आहे.