गडचिरोली - दिल्लीहून जिल्ह्यात दाखल झालेल्या आणखी तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे 36 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 11 आहे.
दिल्लीहून आलेले आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह; जिल्ह्यात रुग्णसंख्या 47 वर
दिल्लीहून जिल्ह्यात दाखल झालेल्या आणखी तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे 36 जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. आता जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 11 आहे.
नव्याने दिल्ली येथून स्वगावी आलेल्या रुग्णांना गडचिरोलीतील वनश्री कॉलनीतील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. हे तीनही रुग्ण 7 जूनला गडचिरोलीत आले होते. यातील दोघे रेल्वेने तर, एक जण विमानाने प्रवास करून आला होता. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
यातील तीनही पुरुष रुग्ण 28 ते 30 वयोगटातील असून त्यांना सध्या तरी कोणत्याही प्रकारची कोरोना लक्षणे नसल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. या तीनही रूग्णांच्या विलगीकरण ठिकाणच्या संपर्कातील इतर पाच प्रवाशांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले होते. आता सात ते आठ दिवसांनी त्यांचेही नमुने दुसऱ्यांदा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.