महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक..! गडचिरोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिक सुखावले

शनिवारी सकाळीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता होती. शुक्रवारी रात्री व आज काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

दिलासादायक..! गडचिरोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिक सुखावले

By

Published : Jun 1, 2019, 4:45 PM IST

गडचिरोली -जिल्ह्याच्या दिक्षिण भागात सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवार संध्याकाळपासुनच भामरागड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

दिलासादायक..! गडचिरोली जिल्ह्यात पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिक सुखावले

शुक्रवारी सकाळपासूनच गडचिरोली जिल्ह्यातील वातावरणात बदल दिसून येत होता. दुपारनंतर शहरात उन्हाचा कडाका वाढला होता. मात्र, रात्रीच्या सुमारास पुन्हा वातावरण बदलले. भामरागड तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर मुलचेरा तालुक्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

शनिवारी सकाळीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता होती. शुक्रवारी रात्री व आज काही ठिकाणी तुरळक प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.

यावर्षी जिल्ह्याचे तापमान 45 अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहीली आहे. शनिवारी मुलचेरा तालुक्यात 4.4 मिमी तर सिरोंचा तालुक्यात 26 मिमी असे सरासरी 2.5 मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद झाली.



ABOUT THE AUTHOR

...view details