महाराष्ट्र

maharashtra

ग्रीन झोन गडचिरोलीतील बँकेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

गडचिरोली पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. मात्र, बँकेमध्ये शासनाकडून पैसे आले, ते परत जातील या अफवेमुळे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये एकाच गर्दी करीत आहेत.

By

Published : Apr 23, 2020, 7:50 PM IST

Published : Apr 23, 2020, 7:50 PM IST

ETV Bharat / state

ग्रीन झोन गडचिरोलीतील बँकेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

gadchiroli lockdown
ग्रीन झोन गडचिरोलीतील बँकेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

गडचिरोली - जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आलेला नाही. प्रशासनाकडून खबरदारी बाळगली जात आहे. मात्र, बँकांमधील चित्र बघितल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्हाभरातील बँकांमध्ये दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हा सध्या ग्रीन झोन मध्ये आहे. जिल्ह्याच्या सीमा यापूर्वीच सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणाही बाहेर जिल्ह्यातील व्यक्तीला प्रवेश बंदी आहे.

ग्रीन झोन गडचिरोलीतील बँकेच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

गडचिरोली पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. मात्र, बँकेमध्ये शासनाकडून पैसे आले, ते परत जातील या अफवेमुळे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये एकाच गर्दी करीत आहेत. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. काही बँकांनी ग्राहकांसाठी बाहेर मंडपाची व्यवस्था केली आहे. मात्र, ती व्यवस्थाही अपुरी पडत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details