महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी 16 मृत्यूसह 519 कोरोना बाधितांची भर

दिवसभरात 577 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सद्या 4552 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 400 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

File photo
File photo

By

Published : Apr 30, 2021, 10:37 PM IST

गडचिरोली - शुक्रवारी जिल्ह्यात 519 नवे रुग्ण आढळून आले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 577 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सद्या 4552 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 400 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.

जिल्ह्यात आज 16 मृत्यू झाले. यामध्ये 65 वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी, 63 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, 43 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी, 65 वर्षीय पुरुष देसपूर ता. आरमोरी, 20 वर्षीय महिला पेट ता. चामोर्शी, 67 वर्षीय पुरुष गोगांव ता. गडचिरोली, 51 वर्षीय पुरुष वडधा ता. आरमोरी, 70 वर्षीय पुरुष वडसा, 58 वर्षीय पुरुष गडचिरोली, 33 वर्षीय पुरुष कुरखेडा, 68 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, 40 वर्षीय पुरुष मोझरी ता. आरमोरी, 50 वर्षीय पुरुष नागभीड जि. चंद्रपूर, 80 वर्षीय पुरुष एटापल्ली, 69 वर्षीय पुरुष हरबी डोंगरगांव ता. वडसा, 65 वर्षीय पुरुष बेलगांव ता. कुरखेडा, यांचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.62 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 21.50 टक्के तर मृत्यू दर 1.89 इतका टक्के झाला.

बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 182, अहेरी तालुक्यातील 38, आरमोरी 46, भामरागड तालुक्यातील 07, चामोर्शी तालुक्यातील 53, धानोरा तालुक्यातील 22, एटापल्ली तालुक्यातील 46, कोरची तालुक्यातील 06, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 29, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 15, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 36 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 39 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 577 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 174, अहेरी 51, आरमोरी 69, भामरागड 13, चामोर्शी 35, धानोरा 33 , एटापल्ली 39, मुलचेरा 10, सिरोंचा 18, कोरची 18, कुरखेडा 46, तसेच वडसा येथील 71 जणांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details