गडचिरोली -कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्चला 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत गडचिरोलीकरांनी यशस्वीपणे कर्फ्यु पाडला.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायंकाळी 5 वाजता कर्फ्यूदरम्यान अनेक नागरिकांनी घराबाहेर पडून थाळ्या आणि टाळ्या वाजवून गजर केला. या माध्यमातून कोरोनाशी लढणाऱ्या आणि कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कर्फ्यूदरम्यान काही ठिकाणी नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. मात्र, ही कारवाई थोड्या वेळातच पूर्ण करून नागरिकांना घरी पाठवण्यात आले.