महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोलीत पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप; चामोर्शी, नागपूर मार्गावर वाहतूक ठप्प

गडचिरोली शहरात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून काही वाहतूक मार्ग ठप्प झाले.

गडचिरोली शहरात मुसळधार पावसाची हजेरी

By

Published : Sep 4, 2019, 5:56 PM IST

गडचिरोली -शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चारही मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. नागपूर आणि चामोर्शी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प आहे.

गडचिरोली शहरात मुसळधार पावसाची हजेरी


आज सकाळी शहरात तीन तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नगरपरिषद, पेट्रोल पंप, महाविद्यालयाची मैदाने पाण्याखाली गेली आहेत. सखल भागांना तर तलावाचे स्वरूप आले आहे.

हेही वाचा - गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार; पाचव्यांदा भामरागडचा संपर्क तुटला


नागपूर मार्गावरील प्लॅटिनम जुबली हायस्कूलजवळ 500 ते 600 मीटर लांब पाण्याचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. चामोर्शी मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद पडली आहे. तर चंद्रपूर मार्गावर आयटीआय चौक पाण्याखाली गेल्याने येथेही वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details