महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेतून दुष्काळावर होणार मात

बुधवारपासून सुरू झालेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन व अनुलोम संस्थेच्या माध्यमातून तलावातील गाळ शेतकऱयांनी शेतामध्ये टाकण्यास सुरुवात केली.

योजना शुभारंभ वेळी उपस्थित मान्यवर

By

Published : Jun 13, 2019, 8:43 PM IST

गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील गिलगाव (जमी) येथे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन व अनुलोम संस्थेच्या माध्यमातून तलावातील गाळ शेतकऱयांनी शेतामध्ये टाकण्यास सुरुवात केली.

'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजनेतील कामे

अनेक वर्षांपासून तलावात गाळ साचून पाणी पाझरण्याची क्षमता संपत असते. गाळ काढून शेतात टाकल्यास शेतीची उत्पन्न पातळी वाढू शकते. तसेच गाव दुष्काळमुक्त होण्सास मदत होऊ शकत असल्याचे मत यावेळी उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी केले.

तलावाचे खोलीकरण झाल्यास परिसरातील अनेक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच परिसरातील पाण्याची पातळी ही वाढण्यास मदत होईल. तलावातील गाळ शेतीत टाकल्यामुळे उत्पन्न वाढीस चालना मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

यावेळी नायब तहसीलदार तनगूलवार सरपंच किरण सिडाम, उपविभागीय अभियंता एच.ए. येनसकर, अनुलोम उपविभाग प्रमुख संदिप लांजेवार, मेडीलवार, अनुलोम भाग जनसेवक शेषराव कोहळे, वस्तीमित्र दीपक कोठारे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details