महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एटापल्लीमध्ये ३० हजाराची लाच घेताना वन रक्षकाला अटक

एटापल्ली वनपरीश्रेत्र कार्यालयातील एका वनरक्षकाला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. सुभाष तेजावत असे या वनरक्षकाचे नाव आहे. घराच्या बांधकमासाठी लाकूड आणताना ४ मार्च ला तक्रारदाराचा ट्रॅक्टर वनरक्षकाने पकडला होता. हे प्रकरण बंद करण्यासाठी वनरक्षक तेजावत याने ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तडजोड करत ३० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते.

forest
जंगल

By

Published : May 13, 2020, 2:08 PM IST

गडचिरोली - वनविभागाच्या भामरागड अंतर्गत येणाऱ्या एटापल्ली वनपरीक्षेत्र कार्यालयातील एका वनरक्षकाला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. सुभाष तेजावत असे या वनरक्षकाचे नाव आहे. एटापल्लीपासून २ किलोमीटर अंतरावर जीवनगट्टा गावात अनिल करमरकर यांच्या घरी तक्रारकर्त्याकडून वनरकक्षकाने ही लाच स्वीकारली. गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

घराच्या बांधकमासाठी लाकूड आणताना ४ मार्च ला तक्रारदाराचा ट्रक्टर वनरक्षकाने पकडला होता. हे प्रकरण बंद करण्यासाठी वनरक्षक तेजावत याने ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने तडजोड करत ३० हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची कल्पना दिली. त्यानुसार सापळा रचून लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनरक्षकाला पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील नागपूर परिक्षेत्राच्या पोलीस उपअधिक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस नामदार सतीश कत्तीवार, सुधाकर दांडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलीस शिपाई महेश कुकुडकर, तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details