महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईल नेटवर्क नसल्याने गडचिरोलीत 'अनलॉक लर्निंग' पॅटर्न...

गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1517 शाळा असून जवळपास 65 हजार विद्यार्थी आहेत. तर अहेरी, भामरागड व गडचिरोली या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 92 शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहेत. यामध्ये जवळपास 32 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

due-to-lack-of-mobile-network-unlock-learning-pattern-in-gadchiroli
मोबाईल नेटवर्क नसल्याने गडचिरोलीत 'अनलॉक लर्निंग' पॅटर्न...

By

Published : Jul 15, 2020, 4:56 PM IST

गडचिरोली- कोरोना संकटामुळे सर्व शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण देण्याचा पॅटर्न राज्यभरात सुरू आहे. मात्र, आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील 50 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही. स्मार्ट फोन असेल तर नेटवर्क नाही. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात 'अनलॉक लर्निंग' पॅटर्न राबवण्यात येणार आहे.

मोबाईल नेटवर्क नसल्याने गडचिरोलीत 'अनलॉक लर्निंग' पॅटर्न...
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1517 शाळा असून जवळपास 65 हजार विद्यार्थी आहेत. तर अहेरी, भामरागड व गडचिरोली या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 92 शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहेत. यामध्ये जवळपास 32 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून शाळा बंद असून परिक्षाही झालेल्या नाही. नवे सत्र सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली. तेव्हा जिल्ह्यातील नववी व बारावीचे वर्ग सुरू झाले. परंतु, 12 जुलैला जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय 31 जुलैपर्यंत बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी नवे सत्र सुरू करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश शासनाने दिले होते. तर ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार नाही, तेथील विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण देण्याचा पॅटर्न राज्यभरात सुरू आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावात आजही मोबाईल सेवा नाही. तर अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने अनेकांकडे मोबाईल नाही. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या 98 हजार विद्यार्थ्यांपैकी जवळपास 50 हजार विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली. त्यामुळे मोबाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाईन शिक्षण' तर मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'अनलॉक शिक्षण' पॅटर्न राबविण्याचा निर्णय येथे शिक्षण विभागाने घेतला आहे.पाठ्यपुस्तके मिळाली मात्र शाळाच बंद...दरवर्षी 26 जूनला नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. यावर्षीही तसेच नियोजन असल्याने गडचिरोली शिक्षण विभागाने तसेच आदिवासी शिक्षण विभागाने सर्वच विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्देशानुसार शाळेत बोलावून किंवा त्यांच्या घरी पोहोचून पाठ्यपुस्तकांचे वितरण केले. नववी व बारावीचे वर्ग सुरू करण्याला शासनाची परवानगी मिळाल्याने या शाळा सुरूही झाल्या होत्या. मात्र, 12 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार 31 जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्यात आले आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाले असले तरी शाळा सुरू झाली नसल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे. अनेक विद्यार्थी तसेच पालकही शाळा सुरू करण्याबाबत उत्साही आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.काय आहे 'अनलॉक लर्निंग' पॅटर्न...आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'अनलॉक लर्निंग' पॅटर्नमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यपुस्तिका व कृती पुस्तक पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार आहे. क्लस्टर पद्धती राबवून त्या-त्या गावांमध्ये गावातील शिक्षित व्यक्ती असलेल्याची समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीमध्ये शिक्षकांचाही सहभाग राहील. कार्यपुस्तिकामध्ये अभ्यासक्रमाची माहिती तर ते कशा पद्धतीने करायचे या संदर्भात माहिती कृती पुस्तिकेमध्ये राहणार आहे. यासंदर्भात गावातील शिक्षण समिती व शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या समित्या प्रकल्प कार्यालयाच्या निर्देशानुसार काम पाहणार आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी 'व्हाट्सअप ग्रुप' अभ्यासक्रम...जिल्हा परिषदेच्या 1517 शाळांमध्ये जवळपास 65 हजार विद्यार्थी आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे आणि त्यांच्या गावांमध्ये मोबाईल नेटवर्क आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन शिक्षण' अंतर्गत शिक्षण विभागाने व्हाट्सअप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुप वर राज्यस्तरावरुन आलेल्या अभ्यासक्रमाच्या लिंक शेअर केले जातात. त्या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना गृहपाठ दिले जात आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल आहे तर नेटवर्क नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी रेडिओ व टीव्हीद्वारे तीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या ब्लॉग स्पॉटवर अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details