गडचिरोली - गडचिरोली - चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सरासरी ६९ टक्के मतदान झाले. ही माहिती रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
गडचिरोली : नक्षलवाद्यांना चपराक; मतदारांच्या प्रतिसादाने लोकसभेसाठी ६९ टक्के मतदान
गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली होती.
गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली होती. सर्व मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉकपोल घेण्यात आले. तर ९५ मदतान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आले.
मात्र, मतदानादरम्यान, एटापल्ली तालुक्यातील कसनसुर मौजा वागेझरी जवळ आईडी ब्लास्ट, गट्टा जांबीया गावाच्याजवळ तसेच पुरसलगोंदी गावाच्या जवळ झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटना वगळता जिल्हयात अन्य ठिकाणी शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.