महाराष्ट्र

maharashtra

गडचिरोलीत बॅटरीवर चालणारे निर्जंतुकीकरण कक्ष, संस्थेच्या मदतीने नगर परिषदेचा उपक्रम

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या आवारात पालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार व नागरिक येतात. त्यांचे निर्जंतुकीकरण झाल्यास कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेवून गडचिरोली नगर परिषद व अजब गजब विचार मंचने या कक्षाची निर्मिती केली आहे.

By

Published : Apr 15, 2020, 8:13 PM IST

Published : Apr 15, 2020, 8:13 PM IST

Battery-operated sterile chamber  Battery operated sterile Gadchiroli  गडचिरोलीत बॅटरीवर चालणारे निर्जंतुकीकरण कक्ष  निर्जंतुकीकरण कक्ष गडचिरोली
गडचिरोलीत बॅटरीवर चालणारे निर्जंतुकीकरण कक्ष

गडचिरोली - येथील नगर परिषद व अजब गजब विचार मंचच्या संयुक्त पुढाकाराने नगर परिषदेच्या आवारात बॅटरीवर चालणारे निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आले. या कक्षामुळे पालिकेत येणाऱ्या नागरिकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत होणार असल्याचा आशावाद पालिकेने व्यक्त केला आहे.

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. नगरपालिकेच्या आवारात पालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार व नागरिक येतात. त्यांचे निर्जंतुकीकरण झाल्यास कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत होईल, ही बाब लक्षात घेवून गडचिरोली नगर परिषद व अजब गजब विचार मंचने या कक्षाची निर्मिती केली आहे.

या कक्षात प्रवेश करताचा लायटिंग सुरू होते. दोन्ही बाजूने सोडियम हायपोक्लोराईड व पाण्याच्या मिश्रणाचा स्प्रे सुरू होतो. या स्प्रेमधून द्रव्याची फवारणी शरीरावर होऊन निर्जंतुकीकरण होते. या उपकरणाच्या माध्यमातून सात ते आठ तासात पाचशे ते सहाशे नागरिकांचे निर्जंतुकीकरण होते. संबंधित उपकरण बॅटरीवर चालत असल्याने विद्युत शॉक लागण्याचा धोका नाही. निर्जंतुकीकरण कक्ष मुख्याधिकारी संजीव ओहोळ, अजब गजब विचार मंचचे सतिश त्रिनगरीवार, आशुतोश कोरडे, सचिन मून, कैलास कोव्हिड यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details