महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल पाच दिवसानंतर भामरागडचा पूर ओसरला; जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

भामरागड शहरापासून एक किलोमीटर अंतरावरच इंद्रवती, पामुलगौतम, पर्लकोटा या तीन मोठ्या नद्यांचा संगम असल्याने पर्लकोटा नदीवरील पुलावर कोणत्याही क्षणी पाणी येऊ शकते. त्यात या नद्या महाराष्ट्राच्या सीमेच्या अगदी जवळ छत्तीसगड राज्यातून वाहतात. त्यामुळे छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास पुलावर पाणी येऊन भामरागडचा संपर्क कधीही तुटू शकतो.

भामरागड न्यूज
भामरागड न्यूज

By

Published : Aug 23, 2020, 6:39 PM IST

Updated : Aug 23, 2020, 6:48 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरील पुराचे पाणी ओसरले आहे. पाच दिवसांपासून बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. भामरागडमधील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. महसूल व नगर पंचायत प्रशासन शहरात साचलेला गाळ, चिखल काढून घेत स्वच्छतेसाठी सरसावले आहेत.

गेल्या पाच दिवसांपासून पुरामुळे भामरागडचा संपर्क तुटला होता. आता तो पूर्ववत होत आहे. गावामध्ये आलेले पुराचे पाणी उतरल्याने मुख्य बाजारपेठ सुरू होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. तेथील पाणीही मागे हटले आहे. कालपासून पाऊस थांबला आहे.

तब्बल पाच दिवसानंतर भामरागडचा पूर ओसरला

भामरागड शहरापासून एक किलोमीटर अंतरावरच इंद्रवती, पामुलगौतम, पर्लकोटा या तीन मोठ्या नद्यांचा संगम असल्याने पर्लकोटा नदीवरील पुलावर कोणत्याही क्षणी पाणी येऊ शकते. त्यात या नद्या महाराष्ट्राच्या सीमेच्या अगदी जवळ छत्तीसगड राज्यातून वाहतात. त्यामुळे छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाल्यास पुलावर पाणी येऊन भामरागडचा संपर्क कधीही तुटू शकतो.

नदीचे पाणी पूर्णपणे उतरले नसले तरी लोक जीवाची पर्वा न करता नदी पार करण्याचे धाडस करतात. प्रशासनाने नदी पार करू नये, असे आवाहन केले तरी लोक ऐकायला तयार नसतात. यासाठी भामरागड एसडीपीओ डॉ. कुणाल सोनवणे, भामरागडचे ठाणेदार गजानन पळटकर, पी. एस.आय ज्ञानेश्वर झोल यांनी येथे सुरक्षेसाठी जवानांना तैनात केले होते. येथील संपर्क तुटल्यामुळे सर्वच जण पाणी पुलाखाली उतरण्याची वाट बघत होते.

सध्या पुलावरून पाणी उतरल्याने भामरागड-आलापल्ली रस्ता मोकळा झाला आहे. यामुळे पाच दिवसांपासून अडकलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तहसीलदार सत्यनारायण सीलमवार, नायब तहसीलदार अनमोल कांबळे, नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव व कर्मचाऱ्यांनी स्वचछतेकडे लक्ष वेधले आहे. भामरागड शहर पुराच्या पाण्यामुळे सर्वत्र चिखलमय झाले आहे. नगर पंचायत कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येत आहे.

Last Updated : Aug 23, 2020, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details