धुळे- पिंपळनेर येथील ईदगाहपाडा व सामोडे या गावातील मजूर गुजरात राज्यातील सुतगी सोमनाथ या ठिकाणी उस तोडणी व गुळ कारखान्यात काम करत होते. लॉकडाऊनमुळे सर्व मजूर गुजरात राज्यात अडकून पडले होते. हे सर्व मजूर पिपळनेर येथे परतले आहेत.
गुजरातमध्ये अडकले होते पिंपळनेर येथील मजूर; आमदाराच्या पाठपुराव्यामुळे परतले घरी
पहिल्या टप्प्यात ५३ मजूर ८०० किलोमीटरचा प्रवास करून परतले होते, तर शनिवारी १०५ मजूर, लहान मुले-मुली असे एकूण १४४ जन गावी परतले होते. या सर्वांची आरोग्य तपासणी पिंपळनेर शहरातील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे.
मजुरांना गावी परत आणण्यासाठी आमदार मजुळाताई गावित यांनी महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असू मजूर गावी परतले आहेत. पहिल्या टप्प्यात ५३ मजूर ८०० किलोमीटरचा प्रवास करून परतले होते, तर शनिवारी १०५ मजूर, लहान मुले-मुली असे एकूण १४४ जन गावी परतले. या सर्वांची आरोग्य तपासणी पिंपळनेर शहरातील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. मजुरांना जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यानंतर या सर्व मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. तसेच, त्यांना कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाय म्हणून योग्य त्या सुचना देण्यात आल्या.
हेही वाचा-डॉ.सुभाष भामरे गोखले यांच्याऐवजी टिळकांचा फोटो ट्विट केल्याने झाले ट्रोल