महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : लळींग किल्ल्याच्या शिखरावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले प्रफुल्ल चव्हाण हे पत्नी, मुलगा यांच्यासोबत सकाळी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या पत्नीचा किल्ल्याच्या शिखरावर असलेल्या मंदिराजवळ अचानकपणे तोल गेला आणि जवळपास ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

By

Published : Nov 20, 2020, 5:21 PM IST

dead women
मृत महिला

धुळे -लळींग किल्ल्याच्या शिखर भागावरून तोल गेल्याने शहरातील गोपाळ नगरात राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ललिता प्रफुल्ल चव्हाण (वय-३८) असे मृताचे नाव आहे.

सकाळी गेले होते फिरायला अन्...

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले प्रफुल्ल चव्हाण हे पत्नी, मुलगा यांच्यासोबत सकाळी किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या पत्नीचा किल्ल्याच्या शिखरावर असलेल्या मंदिराजवळ अचानकपणे तोल गेला आणि जवळपास ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. किल्ल्यावर काम करणाऱ्या लोकांना घटना लक्षात येताच त्यांनी गावाचे पोलीस पाटील यांना तत्काळ घटनेची माहिती दिली.

स्थानिकांच्या मदतीने या महिलेच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. किल्ल्याच्या पाठीमागचा भाग अत्यंत निसरडा व निमुळता असल्याने महिलेचा मृतदेह काढणे खूप कठीण जात होते. लळींग गावातील स्थानिकांसह, इरकॉन टोल कंपनीचे कर्मचारी, मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वनविभागाचे वनमजूर आदींच्या मदतीने अखेर तब्बल तीन तासांनंतर महिलेचा मृतदेह वस्तीच्या भागात आणण्यात आला.

मृतदेह किल्ल्याच्या मागील भागात खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच, प्रफुल्ल चव्हाण यांच्या निकटवर्तीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा -झाडाला गळफास घेतलेले तिघा तरुणांचे मृतदेह आढळले; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

वारंवार घडतात घटना -

या ठिकाणी तोल जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या घटनेनंतर लळिंग किल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details