धुळे - जिल्ह्यात शनिवारी रात्री तब्बल 20 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 238 झाली आहे. गेल्या 2 दिवसात 26 रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. धुळे शहर आणि शिरपूर शहर कोरोनाचे मोठे हॉस्पॉट केंद्र बनले आहे. शनिवारी धुळे जिल्ह्यातील १३ जणांनी कोरोनावर मात केली. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी २० रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये 17 वर्षांपासून ते 75 वर्षे वय असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. तसेच चाळीसगाव रस्ता, सरदार नगर, आझाद नगर, अंबिका नगर, समता नगर या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १६ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.