धुळे- दिवसेंदिवस धुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आज (गुरुवार) आणखी 4 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. धुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 124 झाली आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
धुळ्यात 4 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद, एखूण संख्या 124 वर
धुळे जिल्ह्यात आज आणखी 4 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 124 झाली आहे.
धुळ्यात 4 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील 3 तर विंचूर येथील 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. धुळे शहरातील देवपूर भागातील एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जुने धुळे भागातील एका व्यक्तीचा तर शिवाजीनगर भागातील रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तसेच विंचूर येथील मृत मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी धुळे जिल्हा रुग्णालयातून 4 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर आणखी 4 जणांची वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.