धुळे - कोरोना आजाराबाबत समाजात विविध समज गैरसमज मोठ्या प्रमाणावर पसरत चालले आहेत. या आजाराबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न धुळे तालुक्यातील मोराणे येथील मूळचे रहिवासी असणाऱ्या आणि सध्या मुंबई येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रशांत देसले यांनी केला आहे.
धुळ्यातील प्रशांत देसले यांचं गाणं घालतय सोशल मीडियावर धुमाकूळ
धुळे तालुक्यातील मोराणे येथील मुळशी रहिवासी असणाऱ्या प्रशांत देसले यांनी कोरोना आजाराबाबत जनजागृती करणार तयार केलेलं गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
प्रशांत देसले यांचं गाणं
या गाण्याचं ध्वनिमुद्रण आणि संगीत दिग्दर्शन प्रशांत देसले यांच असून सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलच धुमाकूळ घालत आहे,या गाण्याची सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून या माध्यमातून कोरोना आजाराबाबत जनजागृती होण्यास मदत होत आहे.