महाराष्ट्र

maharashtra

बाप्पाच्या आगमनाची आतुरता; गणेश मूर्तींनी सजली धुळे बाजारपेठ

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्याची ओढ अनेकांना लागली आहे. त्यासाठीच धुळे बाजारपेठ गणेश मूर्तींनी सजलेली पाहायला मिळते.

By

Published : Aug 28, 2019, 9:13 AM IST

Published : Aug 28, 2019, 9:13 AM IST

Updated : Aug 28, 2019, 3:26 PM IST

बाप्पाच्या आगमनाची आतुरता

धुळे - गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे. त्यासाठी गणेश मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच उत्तम पाऊस झाल्याने जिल्ह्यात सुख-समृद्धीचे वातावरण आहे. त्यामुळे गणेश मूर्तींना देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

बाप्पाच्या आगमनाची आतुरता; गणेश मूर्तींनी सजली धुळे बाजारपेठ

हे वाचलं का? -पाचवीत बघितलेले स्वप्न झाले पूर्ण; आता गणेश मूर्तींचा उभारणार कारखाना

शहरातील खरे बंधू यांचा गणेश मूर्ती तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास बघून त्यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. तसेच त्यांच्याकडे कागद्याच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेश मूर्ती त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

हे वाचलं का? -नाशकात गणपती बाप्पा देणार वाहतूक नियमांचे धडे; मूर्तीकार योगेश टिळेंची संकल्पना

गणेशोत्सवाच्या ६ महिन्यापूर्वी गणेश मूर्ती तयार करायला सुरुवात केली जाते. विशेष म्हणजे या कामासाठी घरचे सगळे सदस्य मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. महिला सद्स्य गणरायाच्या मूर्ती आकर्षक रंगांनी रंगवतात. तसेच मूर्तीला जिवंतपणा आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे मूर्तीचे डोळे काढण्याचे काम महिला करतात.

Last Updated : Aug 28, 2019, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details