महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे : समाजकंटकांवरच्या कारवाईच्या मागणीसाठी निघाला मोर्चा

धुळे शहरातील काही समाजकंटकांनी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच हिंदू धर्मियांच्या भावना संतप्त झाल्या आहेत.

By

Published : Jul 13, 2019, 11:33 PM IST

समाजकंटकांवरच्या कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा निघाला

धुळे- देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांची धुळे शहरातून धिंड काढण्यात यावी, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामुळे धुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

समाजकंटकांवरच्या कारवाईच्या मागणीसाठी मोर्चा निघाला

धुळे शहरातील काही समाजकंटकांनी हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदू धर्मियांच्या भावना संतप्त झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी सकाळी काही जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर धुळे शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरापासून शनिवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ मोर्चा आल्यावर आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. समाजकंटकांवर कारवाई न झाल्यास होणाऱ्या परिणामांना पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details