धुळे - जिल्ह्यात रविवारी कोरोना बधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल 51 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. यात धुळे जिल्हा रुग्णालयातील 53 पैकी 26 जणांचे तर शिरपूर येथील 41 पैकी 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील वाढती कोरोना बधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
आज (रविवार) जिल्ह्यात कोरोनाबधितांच्या संख्येत तब्बल 51 रुग्णांची भर पडली. एकाच दिवशी इतक्या जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीत असताना शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यावर जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला असून 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकीकडे मृत्यूदर वाढत असला तरी दुसरीकडे मात्र रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. यावर जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५३ अहवालांपैकी २६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.