धुळे - भारतीय लष्कराचे जवान आणि देशाची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार करून चर्चेत आलेल्या चंदू चव्हाण यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांचा सोशल मीडियावरून प्रचार केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. आमदार अनिल गोटे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
भामरेंचा प्रचार करणे चंदू चव्हाणांना पडले महागात, गुन्हा दाखल
धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष भामरे यांचा प्रचार करणे भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भामरे यांचा प्रचार करणे चव्हाण यांना चांगलेच महागात पडले आहे. यासंदर्भात गोटे यांनी चव्हाण हे फेसबुक अकाउंटवरून भामरेंसाठी प्रचार पोस्ट टाकत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने चौकशी करुन पोलीस ठाण्यात तक्रार केली. चव्हाण हे सैनिक म्हणून सुरक्षा विभागात शासकीय नोकरीवर असतानाच त्यांच्या सोशल मीडियावरुन भामरे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.