धुळे -तालुक्यातील निमगूळ येथील प्राची माळी या बालिकेच्या मारेकऱ्यांचा शोध लावून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, या मागणीसाठी माळी समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
धुळे तालुक्यातील निमगुळ गाव शिवारातील प्रवीण रामराव सैंदाणे (माळी, वय २९) यांची मुलगी प्राची ही नवरात्री काळात बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह गावापासून जवळच असलेल्या शेतालगत एका विहिरीत आढळला होता. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. प्राचीच्या मारेकऱ्याचा शोध घेऊन त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, या मागणीसाठी माळी समाज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.