महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वह्या-पुस्तकांच्या विक्रीतून पालकांची आर्थिक लूट

धुळे शहरातील नॉर्थ पॉईंट नावाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वह्या-पुस्तकांची विक्री करून पालकांची आर्थिक लूट सुरु आहे.

By

Published : Apr 1, 2019, 11:54 PM IST

वह्या-पुस्तकांची विक्री करून पालकांची आर्थिक लूट

धुळे- औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वह्या पुस्तकांची विक्री करून पालकांची आर्थिक लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर हाच प्रकार धुळे शहरात देखील सुरु असल्याचे समोर आले आहे. धुळे शहरातील नॉर्थ पॉईंट नावाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशाच प्रकारे वह्या-पुस्तकांची विक्री करून पालकांची आर्थिक लूट सुरु आहे. याकडे शिक्षण विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.

वह्या-पुस्तकांची विक्री करून पालकांची आर्थिक लूट

शिक्षण क्षेत्रात पडद्यामागून सुरु असलेला सावळा गोंधळ आणि त्यात सुरु असलेला भ्रष्टाचार हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र, या समस्येवर आजवर कोणताही उपाय निघालेला नाही. त्यात खासगी शाळांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार चालतो. मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि पुस्तकांची विक्री करून पालकांची आर्थिक लूट सुरु असल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला होता. मात्र, हाच प्रकार धुळ्यात देखील सुरु असल्याचे आता समोर आले आहे.

धुळे शहरातील नॉर्थ पॉईंट नावाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना शाळेतूनच वह्या आणि पुस्तकांची खरेदी करण्यास बळजबरी केली जात आहे. ज्या वह्या बाहेर बाजारात १५ आणि ३५ रुपयाला मिळतात त्याच वह्या याठिकाणी २५ आणि ५० रुपयांना विकल्या जात आहेत. एकंदरीतच धुळ्यात देखील पालकांची आर्थिक लूट सुरु आहे. मात्र पाल्याचा विचार करून पालकदेखील याबाबत बोलण्यास नकार देत आहेत. तसेच शासनाने प्रकाशित केलेली पुस्तके अभ्यासक्रमाला लावणे अपेक्षित असते. मात्र, याठिकाणी खासगी प्रकाशनाची पुस्तके पालकांना घेण्यास सांगण्यात येत आहे.

वह्या-पुस्तकांची विक्री करून पालकांची आर्थिक लूट

विशेष म्हणजे ही पुस्तके कोणत्या दुकानात विक्रीला ठेवायची हेदेखील शाळाच ठरवते. यामुळे शाळेचे आणि पुस्तक विक्रेत्यांचे आर्थिक हितसंबंध जुळले आहेत का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हा प्रकार ज्या शाळेत सुरु आहे ती शाळा धुळे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील यांच्या शिवाजी विद्याप्रसारक संस्थेची आहे. आता याबाबत शिक्षण विभाग कठोर कारवाई करून पालकांची आर्थिक लूट थांबवतेय का हे बघणे महत्वाचे असल्याची चर्चा पालकांमध्ये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details