धुळे - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून पोलिसांनी धारदार शस्त्रांसह, इनोव्हा कार असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे पोलिसांना मोठा गुन्हा रोखण्यात यश आले आहे.
धुळ्यात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड; लाखांचा मुद्देमाल जप्त
गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकडे तलवार, चाकू अशा धारधार शस्त्रांसह देशी बनावटीचे कट्टे, जिवंत काडतुसे, मिरची पूड, सुटी दोर असे साहित्य आढळून आले.
धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर लळींग टोलनाक्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी एक संशयित इनोव्हा कार (क्रमांक एमएच ०३ एएम ८५६२) पथकाला आढळून आली. या कारमध्ये सातजण होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीची तपासणी केली असता त्यांच्याकडे तलवार, चाकू अशा धारधार शस्त्रांसह देशी बनावटीचे कट्टे, जिवंत काडतुसे, मिरची पूड, सुटी दोर असे साहित्य आढळून आले. सर्व साहित्य पोलिसांनी हस्तगत केले असून ७ जणांना ताब्यात घेतले आहे.
इनोव्हा कार, ४१ हजार रुपयांचे मोबाईल, ६० हजार ८०० रुपये किमतीचे २ देशी कट्टे असा सुमारे १० लाख ९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित नामदेव पाटील, अभिषेक अरुण ढोबळे, पंकज सुरेश साळुंखे, जितेश कुकरेज लालवानी, विकास कांतीलाल लोंढे, मंगेश कृष्णा भोईर आणि रवींद्र सुरेश चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे.