महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धुळे लोकसभा : डॉ. सुभाष भामरेंच्या विरोधात काँग्रेसकडून कुणाल पाटील?

भाजपकडून डॉ. सुभाष भामरे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

By

Published : Mar 16, 2019, 7:56 PM IST

डॉ. सुभाष भामरेंच्या विरोधात काँग्रेसकडून कुणाल पाटील?

धुळे - भाजपकडून डॉ. सुभाष भामरे यांनाधुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कुणाल पाटील हे सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. भामरेंचा पराभव करण्यासाठी तरुण उमेदवार पाहीजे, अशी कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन पाटील यांना उमेदवारी देण्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. गेल्या निवडणुकीत भामरे यांनी काँग्रेसच्या अमरीश पटेल यांचा पराभव केला होता. यावर्षीही धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर रोहिदास पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, डॉ. भामरे यांचा पराभव करण्यासाठी तरुण उमेदवार पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन पाटील यांना धुळ्यातून लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.


एकीकडे काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरु असताना भाजपच्या गोटात मात्र शांतता पहायला मिळत आहे. कुणाल पाटील हे धुळे ग्रामीणचे आमदार असल्यामुळे त्यांचा ग्रामीण भागात संपर्क अधिक आहे. यामुळे याचा फायदा कुणाल पाटील आणि सर्वार्थाने काँग्रेसला होऊ शकतो. यामुळे धुळे लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details