धुळे- शिरपूर तालुक्यातील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. त्यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
दोषींवर कठोर कारवाई करणार - पालकमंत्री भुसे
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे सकाळी केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाणार, असे आश्वासन धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
दादाजी भुसे
ते म्हणाले, जखमींवर सर्व उपचार शासकीय खर्चातून केले जाणार असून नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी न करता वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचे काम करू द्या, अशी विनंती केली.
Last Updated : Aug 31, 2019, 2:30 PM IST
TAGGED:
Dhule update