महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहावीच्या निकालात नाशिक विभागात धुळे जिल्हा अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात धुळे जिल्ह्याने नाशिक विभागातून पुन्हा एकदा बाजी मारली असून सर्वाधिक निकाल शिरपूर तालुक्याचा लागला आहे.

By

Published : Jul 29, 2020, 5:05 PM IST

दहावीच्या निकालात नाशिक विभागातून धुळे जिल्हा अव्वल
दहावीच्या निकालात नाशिक विभागातून धुळे जिल्हा अव्वल

धुळे -दहावीच्या निकालात नाशिक विभागात धुळे जिल्हा अव्वल आला आहे. तर, जिल्ह्यात शिरपूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे. शिरपूर तालुक्याचा निकाल 96.58 टक्के इतका लागला आहे. यामुळे धुळे जिल्हा पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात धुळे जिल्ह्याने नाशिक विभागातून पुन्हा एकदा बाजी मारली असून सर्वाधिक निकाल शिरपूर तालुक्याचा लागला आहे. धुळे जिल्ह्यातून 31 हजार 836 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता आणि कोरोनामुळे निकालही लांबणीवर पडला होता. मात्र, निकालाचा दिवस शेवटी उजाडलाच.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 96.58 टक्के इतका निकाल लागला आहे. शिरपूर तालुक्यातून 5 हजार 12 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 841 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, विशेष प्राविण्यासह 2 हजार 841, प्रथम श्रेणी 1 हजार 492 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत साक्री तालुक्याचा निकाल 96.23 टक्के, धुळे शहर 92.62 टक्के, शिंदखेडा तालुका 93.9 टक्के तर, धुळे तालुक्याचा 93.7 टक्के निकाल लागला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details