महाराष्ट्र

maharashtra

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारपेठ गजबजली, नागरिकांकडून अनेक वस्तुंची खरेदी

अक्षय तृतीयेसाठी लागणारे घागरी आणि आंबे धुळ्यातील बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. आंबे आणि घागर खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे.

By

Published : May 7, 2019, 2:37 PM IST

Published : May 7, 2019, 2:37 PM IST

अक्षय तृतीयेनिमित्त धुळे बाजारपेठेत गर्दी

धुळे - अक्षय तृतीयेनिमित्त विविध वस्तू बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. खानदेशात अक्षय्य तृतीयेचा सण उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.

अक्षय तृतीयेनिमित्त सजलेली धुळ्याची बाजारपेठ

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण खान्देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अक्षय्य तृतीयेला माहेरवाशिणी आपल्या माहेरी येतात. या दिवशी घरातील मृत झालेल्या व्यक्तीला पाणी मिळावे. यासाठी लाल मातीची घागर भरून त्यावर आंबा ठेवला जातो. विधीवत पूजा केली जाते. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या घागरी आणि आंबे धुळ्यातील बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. आंबे आणि घागर खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे.

आंब्याची विक्री ८० रुपये किलो या दराने सुरू आहे. मुंबई, जळगाव अशा विविध जिल्ह्यातून हे आंबे विक्रीसाठी आणले आहेत. अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details