महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 24, 2020, 2:44 PM IST

ETV Bharat / state

धुळ्यातील एका व्यक्तीच्या मृत्यू बद्दल संभ्रम कायम; कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा?

धुळे महापालिकेतील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचे निधन कमी रक्तदाबामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मृत्यूचे अधिकृत कारण समोर आलेले नाही.

confusion about corona death in dhule
धुळ्यातील एका व्यक्तीच्या मृत्यू बद्दल संभ्रम कायम; मयत कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा?

धुळे - महानगरपालिकेतील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

धुळे महानगरपालिकेतील एका लोकप्रतिनिधीच्या भावाचे निधन झाले, त्याचे निधन हे कमी रक्तदाबामुळे झाले असल्याचे सांगण्यात आले होते. या व्यक्तीवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूनंतर कोरोना तपासणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले होते.

मृत व्यक्तीचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. रुग्णालय प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिली नसून रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

धुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details