धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघोडा गावाजवळ असलेल्या केमिकल कंपनीच्या स्फोटानंतर या कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेला चोवीस तास उलटून देखील अद्यापही कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी समोर आलेला नाही.
हेही वाचा - ठाणे : रेफ्रिजरेटरमध्ये आग, कुटुंब होरपळले
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघोडा गावाजवळ असलेल्या रोमित या केमिकल कंपनीत शनिवारी बॉयलर चा स्फोट झाला. या घटनेत १५ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्हा हादरला असून या घटनेनंतर रोमित कंपनी विरोधात पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मालाडमध्ये सिलिंडरचा स्फोट; एकीचा मृत्यू चार जखमी
या घटनेला २४ तास उलटूनही कंपनीचा एकही जबाबदार अधिकाऱ्याचे नाव अद्यापही समोर आलेले नाही. यामुळे हा घातपात होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण झाली असून कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे.